मुस्लीमद्वेष हा मुख्य सामाजिक आणि राजकीय विचार बनत चालला आहे... इतक्या टोकाच्या राजकीय विचारांच्या काळात आपण जगत आहोत...
ही भूमी जशी गांधींची, तशी ती मौलाना आझादांची आहे. जशी शिवाजी महाराजांची, तशी टिपू सुलतानची आहे. जशी भगतसिंगची, तशी ती हुतात्मा कुर्बान हुसैन यांचीही आहे. पण आता मुस्लिमद्वेषापोटी या सर्व इतिहासातून एका विशिष्ट समाजाला वगळले जात आहे. तेव्हा पुरोगामी, डावे आणि मानवतावादी म्हणून आपली जबाबदारी वाढली आहे. उदगीर शहराने सातत्याने या झुंडशाहीचा मुकाबला करण्यासाठी सामाजिक समतेच्या चळवळींची पाठराखण केली आहे.......